मारुतीनं लावलं कुंकू

Date: 
Sun, 6 Jan 2013

कितीतरी वर्षं झाली. पिकेट रोडच्या मारुतीजवळ, मंदिराकडे पाठ करून, कोणाची तरी वाट पहात उभा होता. पिकेट रोडवरचा मारुती रस्त्यावरच आहे. कोणी तरी युवती मनोभावानं हात जोडून पुटपुटत होती, “मारुतीराया, माझं लग्न लवकर जमू दे. “
तरुण आवाज ऐकला म्हणून चमकून मागे पाहिलं, कारण मागणं विपरीत वाटलं. तारुण्यानं स्वत:च्या मनगटावर जे मिळवायचं ते मिळवावं. मागू नये. मागणं हा पहिला विपरीतपणा होता. आणि दुसरा जो विपरीतपणा होता तो उघडच होता. मी माझ्या विचारात व्यग्र होतो, तरी माझ्या मनात स्मितहास्याच्या गुदगुल्या आपोआप उमलल्या. मी मनात म्हटलं, “बाई गं कुठल्या देवाजवळ काय मागते आहेस? ब्रह्मचर्यासाठी प्रसिध्द असलेल्या या देवताप्रतीकाशिवाय दुसरा देव तुला नाही वाटतं मिळाला, ब्रह्मचर्यभंग मागायला? “
तिला हे सगळं सांगून फायदा नव्हता. मारुतीमुळे भूतबाधा जाऊ शकते. रोग जाऊ शकतात, मनोकामना पूर्ण होतात, अशा अनेक समजुती आहेत. ‘भीमरूपी महारूद्रा’ हा मारुतीचा महामंत्र प्रसिध्द आहे. तिथलं रूद्रपण मारुतीच्या विशेषणासारखं आहे. पण त्यामुळे त्याला शिवाचा अवतार म्हणूनही मानलं आहे. रूद्र आणि हनुमान यांची सामर्थ्य मिळवणारा एक मंत्रही प्रसिध्द आहे.

“ॐ नमो हनुमंते, रुद्रावताराय, पञ्चवदनाय
पूर्वमुखे सकलशत्रुसंहारकाय रामदूताय स्वाहा।”

मारुतीला वीरत्वाशी एकरूपच समजतात. वाराणशीच्या वीरमारुतीचे चित्र वर आहे.
मारुतीच्या स्मरणाने मनाला धीर येईल. पराक्रमाची कक्षा वाढेल. शरीर धष्टपुष्ट करावंसं वाटेल. आणि त्यामुळे सगळं जीवन सुधारेल. हे सगळं मानसशास्त्रीय दृष्टीनं शक्य आहे. कारण मारुती हा वीरप्रतीक अ्राह. त्याच्यावरची एकाग्रता तुमच्या जीवनाला वीरत्वाचा स्पर्श का म्हणून करणार नाही?

मारुती हा निष्ठेच्या प्रतीकाचा तर आदर्श पुतळा आहे. त्याच्या अंगावर शेंदूर कसा आला, याची एक मजेदार आख्यायिका आहे.
सीता एकदा कपाळाला कुंकू लावत होती. मारुतीनं विचारलं, “तू हे डोक्यावर लाल काय लावत असतेस? “
“त्यामुळे रामाचं आयष्य वाढतं.”सीतें सोप्या शब्दात उत्तर दिलं.
मारुती ताडकन् उठला. ताड् ताड् मुक्कामाला पोहचला. “तांबडा ठिपका अंगावर लावून रामाचं आयुष्य वाढतं, तर मग एक ठिपका कशाला? “ असं पुटपुटत त्यानं सगळ्या अंगावर तांबडे ठिपके काढले. अगदी एकमेकात मिसळलेले.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView