मुंगीने पर्वत गिळला.

Date: 
Sun, 15 Jan 2012

मानसाशास्त्राचा एक गंमतीदार सिध्दांत आहे. बाहेर कोठे अपमान होऊन तुम्ही घरात आला असाल, तर तुमचा राग तुम्ही मुलांवर काढता. तुम्हाला पोहोचलेला धक्का कुठेतरी पोहोचवायचा असतो.
काही नियम असे असतात की ते देवालाही चुकलेले नसतात. प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी एवढं छळलं, की शेवटी विष्णूला अवतातर घ्यावा लागला. का अवतार घेऊन हिरण्यकश्यपू फाडला गेला. हिरण्यकश्यपूचं अशीव राज्य संपलं. सर्व प्रजेनं विष्णूचा जयजयकार केला पण नरसिंहाच्या नखशिखांत आलेला राग शमत नव्हता. प्रत्येक अवतार घेताना एका वृत्तीचं विशेष हरण करून देवाला खाली यावं लागतं. वराहाच्या अवतारात निष्ठेचं व शौर्याचं, रामाच्या अवतारात सत्याचं, तर कृष्णाच्या अवतारात बुध्दीवादाचं. तसं नरसिंहाच्या अवतारात त्यानं क्रोधाचं अंगार वस्त्र अंगावर घेतलं होतं. अगदी साक्षात् नखशिखांत. नरसिंहाचे डोळे अग्निज्वाला ओकत होते. श्र्वासात नागाचे फुत्कार आले होते. नखात तीक्ष्णतेच्या तलवारी खोचल्या होत्या.
आणि मग हिरण्यकश्यपूचा नि:पात झाला, पण नरसिंहाचा संताप सामर्थ्याचा नि:पात होण्याचे लक्षण दिसेना. पुरोहितांनी मंत्रघोष म्हटले. गंगचे शांतीपाठ ऋषींनी मदतीला आणले. साऱ्या पारिजातकांचे सुगंध कोमल ललनांच्या हातांनी नरसिंहाच्या सभोवार उभे केल.
पण संतापाचा तो महामेरू विझू शकला नाही. नरसिंहच्या उघड्या पापण्यातून दग्ध ज्वाला अशाच फेकल्या गेल्या असत्या, तर सगळे जग जळून गेले असते. कोणाला काय करावे ते सुचेना.
पण परस्पर विरोधी नियम मानसशास्त्रातही आहे. जाणते जग थकले तेथे भक्तीभावाने ओथंबलेले एक अजाण पोर समर्थ ठरले. प्रल्हाद पुढे आला. आपल्या कोमल हाताचा स्पर्श त्याने नरसिंहाच्या थरथरत्या पावलांना केला. नरसिंहाने दचकून खाली पाहिले. आणि क्षणार्धात नरसिंहाला आपल्या मूळ रूपाचं भान आलं. एवढ्याशा मृदु मुंगीने रागाचा हिरवा पिवळा पर्वत गिळला.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView