रंग ॐ प्रमाणे

Date: 
Sun, 12 Apr 2015

पुरावा क्रमांक 51: रंग ॐ प्रमाणे

मागील पुराव्यात आपण रंग आणि AUM अक्षरांचा संबंध पाहिला. तेथे पंाढरा रंग हा दीर्घ लहर लांबीचा आहे, कारण काळा हा तुलनात्मक रीतीने लघु लहर प्रक्षेपित करतो. तसा उल्लेख, ‘नाईन कलर्स ऑफ रेन बो’ मध्ये पान सदुसष्ठवर आहे. यामूळे तांबूस आणि निळसर रंग तुलनात्मक रीतीने अनुक्रमे मध्यम आणि लघु शक्तीचे गृहित धरावे लागतील.
रंग आणि वर्ण यांचा संबंध, हा व्यक्तीचा अनुभव असतो, हे खरे. पण व्यक्तीचय अनुभवातूनसुध्दा त्या त्या मर्यादेवर सत्याला निकट असे पुरावे सापडू शकतात, हे महत्त्वाचे आहे. यातील एक संदर्भ आपल्याला पुढील पुराव्यात मिळणार आहे.

पुरावा क्रमांक 52: ॐ, रंग आणि स्पर्श

मागील दोन पुराव्यांचा संदर्भ पुढे चालवू. ‘ऑन दी ट्रॅक ऑफ डिस्कव्हरी’या ग्रंथाच्या पान एकशे पंच्याऐंशीवर एका मुलीचे उदाहरण आहे. ती मुलगी डोळे बांधून केवळ स्पर्शाने रंग ओळखू शकते. रंगाचा स्पर्श कसा वाटतो, असे विचारल्यावर तिने सांगितले की, तांबडा रंग गुळगुळीत व घसरता आहे. हिरवा रंग तरंगमय वटतो. (वेव्ही) आणि निळा रंग समांतर (पॅरलल) असल्याचा भास होते. मागील पुराव्यात, आपण मूल्य तुलनात्मक असतात असे म्हटले, त्याचा उपयोग आपल्यला येथे झाला. येथे घसरता स्पर्श म्हणजे लॉंग वेव्हलेंग्थ. वेव्हरी त्यापेक्षा तरंगमय आणि निळा अधिक सूक्ष्म तरंंगमय असे वर्णन करता येईल. म्हणजेच पुन्हा आपण ओमपाशी पोचलो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView