रविवारचा खरा मंत्र

Date: 
Sun, 13 Jan 2013

नारद आकाशातून पृथ्वीकडे निघाले तेव्हा त्यांच्या भोवती सगळे ग्रह तारे जमले.
नारद सूर्याला म्हणाले, “पृथ्वीवरचे लोक तुझं चित्र कसं पूजतात, ते पाहा. आणि तुझ्याकडून त्यांना काय काय मिळवायचं असतं तेही ऐक. बृहज्योतिषसारात रविवारी कोणती कृत्ये शुभ होतात, हे लिहिलं आहे. “राज्यावर बसण्याचा उत्सव, कुठलीही पूजा, राजकीय, गोधन व्यवहार, होम मंत्राचा उपदेश, औषधारोग्य शल्यकर्म, सोने, तांबे-चामडे-लाकूड खरेदी-विक्री आणि युध्द कार्य”
नारदांनी पुढे मंत्राचा, म्हणजे माणसांच्या मागण्याचा अर्थ सूर्याला सांगितला. “ऋग्वेदातल्या 7.63.4या मंत्राचा उल्लेख केला.
नूनं जना: सूर्येण, प्रसूता अयन्नार्थानि कृणवन्नपांसि।
अर्थ: सर्व जगाला जागे करणारा सूर्यच असून, त्याच्याच प्रेरणेने लेाक आपापल्या धनोत्पादक कार्याला लागतात.
सूर्याचा चेहरा मावळला. माणसांचे आपल्याबद्दलचे चमत्कारिक ग्रह झालेले पाहून मावळेल नाही तर काय? तो म्हणाला, “माझं स्वत:चं तरी काय आहे? सविता महाशक्तीकडून मिळालेलं, मी काही राखून न ठेवता गायत्री प्रक्रियेनं जगाला वाटत सुटतो एवढंच. “

त्याची समजूत घालण्याच्या स्वरात नारद म्हणाले, “तू म्हणतोस त्या अर्थानंसुध्दा तुझ्याबद्दल विचार करणारे काही लोक आहेतच. तुझ्या शक्तीरहस्याला ते लोक गायत्री म्हणतात. “

“गायत्री” सूर्य खुषीनं पुटपुटला. त्याच्या खुषीची किरणं मोत्यासारखी खळखळली. पण त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा नाराजीचा अंधार पसरला. तो म्हणाला, “पण तुम्ही मघाशी निराळा अर्थ सागितला. माझ्यामुळे फुकटाफाकट माणसांना मिळेल असं ते समजतात तरी कसं? मी येथे चोवीस तास माझ्याभोवती ग्रहमाला फिरविण्याचे कष्ट घेता आहे ते उदाहरण न घेता, नुसती माळ फिरवून माणसाच्या हाती काय लागणार? ““ठीक बोललात रविराज! तुमच्या नावानं या माणसांनी एक खास दिवस राखून ठेवला आहे. “
“असं! काय करतात माणसं त्या दिवशी? खूप काम करता ना? “रविराज उत्सुकतेने म्हणाले.
नारदांनी वीणेवर एकदा “नारायण, नारायण” असे हताश सूर वाजवले आणि ते म्हणाले, “नाही रे राजा! त्या दिवशी ते चक्क कामाना रजा देतात. स्वत: रजा घेतात. “
सूर्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली.
नारद उमेदीनं म्हणाले, “खचू नका रविराज! माणसांना धीर देणं, त्यांना प्रकाश दाखविणं हेच तुमचं काम आहे ना? मीच त्यांना तुमचा निरोप सांगीन, की लोकहो, तुम्हाला मंत्र जरूर लागू पडेल. त्याला फक्त सूर्याला शोभेल असं दुसऱ्यासाठी जळण्याचं पथ्य जोडा. हे माणसाला नक्की पटेल. ते माझं ऐकतील. “
सूर्य आशेच्या उकळ्यांनी लखलखला. जणू महाज्ञानाची माध्यान्ह जगावर मोहरली.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView