लाचेचा शाप टाळण्यास

Date: 
Sun, 24 Mar 2013

वसंताचे एक मित्र मोठे सुपरिंटेंडेंट होता. त्यांना घेऊन वसंता मामांच्याक डे गेला, आणि त्यांना म्हणाला, “प्रायश्र्चित्त घेणं वगैरे धार्मिक भाकडकथांवर माझा विश्र्वास नाही, हे तुम्हाला माहीतच आहे. पण या माझ्या मित्रांना याबाबतीत तुमचा सल्ला हवा आहे. “
काही दिवसांपूर्वी या सुपरिंटेंडेंटनी एकदा मामांना विचारलं होतं, “सगळं जर आपल्या कर्मानं मिळतं तर आम्हाला मिळणारी लाचही पूर्व जन्मातील कर्मानं मिळत आहे, असं म्हणून, तुम्ही दोष देण्याचं का थांबवू नये? “
मामांनी तेव्हा उत्तर दिलं होतं, “हा कोणी कोणाला दोष द्यायचा, न द्यायचा, प्रश्र्नच नाही. पण तुमच्या विधानातल्या तीन आपत्ती सांगतो, पहिला मुद्दा असा समजा, गेल्य जन्मात तुम्ही चांगलं कर्म केलतं, आणि फळं भोगली नाहीत, ते फळ भोगायचं उरलेलं होतं, असं समजलं तर ते तुम्हाला लाचेसारख्या चुकीच्या मार्गानं, निसर्गानं पोचवलं नसतं.”
हा मुद्दा चपखल होता, तरी बिनतोड नव्हता. म्हणून सुपरिंटेंडेंट मामांच्या दुसऱ्या विधानाकडे लक्ष द्यायला लागले.

“दुसरं असं पहा, की गेल्या जन्मीचं उरलेलं भाग्य तुम्ही भोगता आहात, असं समजू. पण “कष्ट करायचे आणि भोगायचे नाही” ही गेल्या जन्मातली चांगली सवय, या जन्मात तुम्ही सोडून दिली. आणि तुमच्या भाग्याचा हिशेब या जन्मात मिटला. याचा परिणाम पुढल्या जन्मात काय होईल? तेव्हा तुम्हाला भाग्यही उरणार नाही आणि काम करण्याची सवय या जन्मात तुम्ही सोडून दिली आह, त्यामुळे तीही उरणार नाही. “
हा दुसरा मुद्दा मात्र सुपरिंटेंडेंटच्या कानातून मनात उतरला. शेवटी मामांनी तिसरा मुद्दा सांगितला, “आणि असं पहा, हे गेल्या जन्मीचं कर्मभाग्य या जन्मात नेमकं कुठं संपतं आहे, हे तुम्हाला कळण्याचा मार्ग नाही, पण लाच घ्यायची सवय कायम राहिलेली आहे. अशा क्षणाला, तो भाग्यवाटा संपलेला असेल तर, तुम्ही बेसावध असाल, आणि लाच घेताना तुम्ही पकडले जाल. “

हा तिसरा मुद्दा मात्र सुपरिंटेंडेंट साहेबांच्या मनापर्यंत पोचला. त्यांनी हसून मान डोलावली. चर्चा साजरी केली. तेव्हा मनाला कळलं होतं, पण वळलं नव्हतं. आणि नेमके ते सुपरिंटेंडेंट तीन दिवसांपूर्वी लाच घेताना सापडले होते. म्हणून मामांच्याकडे धावत आले होते. यावेली उतरलेलं तोंड गोल चेहरा घामानं डबडबलेला, हातही किंचित् थरथर कापत असलेले.

मामांनी आपलं मत दिलं, “तुम्ंहाला हवा आहे, त्या उपाध्यायाचा पत्ता मी सांगतो. पण तुम्हाला खरी गरज आहे ती मन अधिक बळकट होण्याची. मी सांगतो ती पुस्तके तुम्ही वाचा. चिंतन करा. अभ्यास करा. वाईट कर्म खोडण्याचं रबर, चांगलं कर्म हेच असतं.”

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView