वटसावित्रीचे व्रत करावे का?

Date: 
Sun, 27 Nov 2011

आज मामांच्या हातात वसंता सापडला होता. बुध्दीनिष्ठ वसंताची बायको पद्मा, दुसऱ्या दिवशीच्या वटसावित्रीच्या व्रताची यादी मोलकरणीला सांगत होती, तेव्हा मामा हजर होते. मामांनी गंभीरपणे विचारलं, “पद्मा नवऱ्याबद्दल तुम्ही बायका काय प्रार्थना करता? “
पद्मा म्हणाली, “मी प्रार्थना करते की, मला अहेवपणी मरण दे. म्हणजे हे जिवंत असतानाच मी मरून जाऊ दे. त्यांच्या मागून उरायला नतो. “
“जनातली व मनातली प्रार्थना उलटसुलट असते असंच ना? “मामा मिस्किल गंभीरपणे म्हणाले. आणि मग उत्तर ऐकायला न थांबता त्यांनीच आपला प्रश्र्न पुढे दामटला, “बरं दुसरी प्रार्थना कोणती? “
पद्मा आवंढा गिळून म्हणाली, “जन्मोजन्मी हाच पती दे. “
मामांनी आपली गंभीरता अधिक गडद केली. आणि म्हणाले, “यापैकी निदान एक प्रार्थना तरी ढोंगी मूर्खपणाची आहे.”
पद्माच्या चेहऱ्याचा चंबू झाला. तेव्हा मामांना आपला खुलासा करणं भाग पडलं. ते म्हणाले, “असं पहा. तू अहेवपणी मरणार, म्हणजे पुढच्या जन्मी तू पहिल्यांदा जन्माला येणार. आणि वसंत तुझ्यामागून जन्माला येणार. पुढल्या जन्मी तू मोठी तो लहान तर मग तुमचं लग्न कसं होणार? “
पद्माच्या चेहऱ्याचा चंबू गोंधळला. तिनं वसंताकडे पाहिलं. पण नवऱ्याकडून कुमक येण्याचं काहीच चिन्ह दिसेना. कारण बुध्दिवादी म्हणणाऱ्या वसंतानं स्वत:साठी चाललेली पद्माची प्रार्थना कधीच आवडली नव्हती. मामा पद्माला आणखी चिडवत म्हणाले, “एक तर तुला अशी प्रार्थना करायला हवी. एक वेळ यांच्याशी लग्न झालं तर झालं. पुन्हा पीडा नको. किंवा- “
पद्मानं कानावर हात ठेवले. किंचितशी किंचाळली आणि म्हणाली, “बोलू नका, बोलू नका. मग आता प्रार्थना करू तरी काय? “
संबंध संवादात, मामा आताच ‘गांभीर्य गडा ‘वरून खाली उतरले आणि विस्फारलेल्या तोंडाने पद्माने म्हणाले, “नवऱ्याला सांग, ऊठ सूट बुध्दिवादाच्या गप्पा मारू नको. बुध्दिवाद अवश्य राखावा. पण अवश्य तेथे त्याची मर्यादा मानावी. वटवृक्ष हा भक्कम आधाराचं जीवनचिन्ह आहे. त्याच्या साक्षीनं आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी शक्ती मागावी. “

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView