वडिलांना नमस्कार काय म्हणून?

Date: 
Sun, 14 Apr 2013

पिठोरी अमावस्येला मातृदिन पाळण्याची चाल सुरू झाली आहे. आमच्या प्रयोगकेंद्राद आम्ही ‘झोपेतून शिक्षणा’बद्दल माता-मुलांना माहिती देण्यासाठी खास राखून ठेवतो. त्यात सूचना असते, “वर्षातून एकदा तरी मातेला मान द्यायला शिका. “ या वाक्यात, ज्या मुलाला ‘एकदा तरी’हे शब्द खटकत नाहीत, त्या मुलाबद्दल काय बोलणार? अठरा-एकोणीस वर्षाच्या एका मुलाची गोष्ट सांगतो.
अभय हा अठरा-एकाणीस वर्षाचा मुलगा. आई-वडिलांना खाली वाकून रोज नमस्कार करण्याची अट स्मरणवर्धनाच्या आमच्या प्रयोगात आहे. ती त्याला पटली. पण अभय म्हणू लागला, “आईला प्रत्यक्ष खाली वाकून नमस्कार करायला लाज वाटते. तर मी मनातल्या मनात तसा नमस्कार केला, तर चालेल का? “

“काही हरकत नाही. “मी म्हटले. शेजारीच अभयची आई हेाती. तिला विचारले, “हा मुलगा तुम्हाला उद्यापासून नमस्कार करणार आहे. पण मला सांगा, हा जेवतो केव्हा? “
“अकरा वाजता. “आईने उत्तर दिले. तिच्या मनातही कुतूहल जागृत झाले होते.

मी आईला म्हटले, “मग तुम्ही असं करा. उद्या जेव्हा अभयबाबू जेवायला बसतील, तेव्हा तुम्ही फळीवरून कणकेचा डबा काढा. पण तो मनातल्या मनात. मग कणिक भिजवा, मनातल्या मनात. पोळ्या लाटा, त्याही मनातल्या मनात. आणि अभयबाबूंच्या पानात पोळ्या टाका, त्याही मनातल्या मनात. “
तोंडात चंबू करून अभयबाबू उभे होते. गोंधळलेले. आणि माझ्या प्रश्र्नार्थक मुद्रेकडे गोंधळूनच पाहणारे!
मी अभयबाबूंना विचारले, “चालेल ना असे हे? “
“ते कसे चालेल? “अभयबाबू थोडेस आवाज चढवून म्हणाले.

मीही थोडा आवाज चढवला, “आई तुम्हाला प्रत्यक्ष जेवायला घालते. तुमच्यासाठी स्वयंपाकी होते. दहा वेळा तुमच्यासाठी स्वयंपाक करताना वाकते. कपडे धुताना पन्नास वेळा वाकत असेल. इतक्या वर्षात लाखो वेळा तुमच्यासाठी तिने खाली वाकायचे कष्ट घेतले. ते सगळे प्रत्यक्ष. वडिलही तुमच्यासाठी दिवसभर राबतात. 10-20वेळा त्यांनाही वाकावे लागते. जगात फुकट काहीच मिळत नाही. आई-वडिलांच्याकडून तुम्ही सगळे मोफत घेता आणि तुम्ही तर फुकटचा नमस्कारसुध्दा, मनातल्या मनात करायची गोष्ट करता. अशा कृतघ्न मुलासाठी आई-वडिलांनी का म्हणून प्रत्यक्ष कष्ट करावेत? “

अभयबाबू स्तब्ध राहिले. आणि अर्ध्या मिनिटानंतर उत्स्फूर्तपणे म्हणाले, “माझी चूक मला कळली. “
हेतूमुळे शरीरात बदल होतात, हे प्रयोगकेंद्रातील अभ्यासवर्गा दाखवून दिले जाते. ‘कृतज्ञता हेतू’ने खाली वाकून नमस्कार करताना, मेंदूच्या भागात रक्तपुरवठा वाढतो, तेव्हा तो मुलाला अधिक सार्थ सहाय्य करतो. म्हणूनही तो संस्कार आला असावा. मुलामुलींनी हा निश्र्चय पिठोरी अमावस्येला करावा. पिठोरी अमावस्या हा बैलाला म्हणजे जनावरालासुध्दा मुलासारखे वागवण्याचा दिवस. भारतीय संस्कृतीने हे सर्वंकष समताप्रेम संस्कृती प्रवाहातून पसरवले. अमावस्येसारख्या अंधारवटावर टांगलेला हा संस्कृतीचा दिव्य-दीप. पिठोरी अमावास्येच्या व्रतातले पक्वान्न स्त्री ने डोक्यावर घेऊन,
“कोणी अतिथी आहे का? “असा प्रश्र्न विचारायचा असतो. पक्वान्न मुलाला मिळतेच पण लायग अतिथी सेवेची संस्कृतीही येथे पोसली जाते.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView