वाचवणाराचं मोठेपण

Date: 
Sun, 11 Dec 2011

नेम बरोबर लागला होता. काही क्षणापूर्वीचं चिवचिव करणारं ते इवलंसे, चिमणं पाखरू. अशोकाच्या त्या उंच फांदीवर हिरव्या पानांची शाल पांघरून, समोर पसरलेल्या निळ्याशार डोंगराकडे कुतूहलानं पहात होतं. मातापित्यांनी नुकतंच घरट्यातून बाहेर पडायला त्याला शिकवलं होतं.
टुणुक! टुणुक! टुणुक!
मोठी मजा वाटायची उड्या मारताना. पंखाचे पंखे अजून भिरभिरायला लागले नव्हते, पण लवचिक पायांच्या वेळणा, उड्या मारण्यापुरत्या ताकन पुरवित होत्या. इकडे तिकडे माना मुरडण्यात, फळाचा एखादा कण दिसला तर तो पटकन चोचीनं टिपावा. पाण्याचा एखादा ओहोळ पायापर्यंत पोहोचला, तर तो चोचीनं शोषावा. इथपर्यंत अक्कल व बळ, आईवडिलांनी या चिमण्या पाखरापर्यंत पोहोचवलं होतं.
दूर अंतरावरच्या दुष्ट दवेदत्तानं आपल्या गोफणीतला दगड, या कोवळ्या किलबिलाटाकडे सोडला.
बिचाऱ्या पाखराला खडा लागला. मग श्र्वास आखडला, डोळे फिरले. पाय आधारहीन झाले आणि तो निराधार छोटासा जीव, अशोकाच्या उंचीवरून शोकाच्या पाचोळ्यात खाली कोसळला.
देवदत्त तीरासारखा आपल्या विजयाच्या वाटेकडे धावत सुटला. पण तो पोहोचण्यापूर्वीच त्या दुर्देवी पाखराला नवा आसरा मिळाला. गौतम बुध्दानं त्या चिमण्या जीवाला हातात घेतलं. त्याला धीर दिला. त्याच्या चोचीत पाणी टाकलं. त्याच्या पाठीवरून स्वत:चा वेदनाहारक हात फिरवला.
देवदत्त संतापाने बेभान झाला. दुसऱ्याच्या वेदना पाहून आनंद होणाऱ्यांची जातीतला हा देवदत्त, बुध्दाचं कारुण्य सोसू शकत नव्हता. त्याला पाखराची तडफड पहायची होती. प्राण घ्यायचा होता.
त्यानं बुध्दाला बजावलं, “मुकाट्यानं ते पाखुरडं मला दे. त्याच्यावर माझा हक्क आहे, मी त्याला मारलं आहे. “
बुध्दानं, संतापाला शांतीचं उत्तर दिलं. तो म्हणाला, “तू मारलं असशील पण त्यामुळे ते पाखरू तुझं ठरत नाही. “
“म्हणजे काय?” हाताच्या मुठी वळत देवदत्तानं विचारलं.
बुध्दाचे हात पाखराला गोंजारीतच राहिले होते. तो म्हणाला, “मारणाऱ्याची मालक असू शकत नाही. मालकी वाचविणाऱ्याची असते. “
“म्हणजे काय?” देवदत्ताचा संताप शिगेला गेला होता.
सत्याची शंाती बुध्द सांगत होता, “एकाद घर पाडणाऱ्याच्या मालकीचं कसं होईल? ते बांधणाऱ्याच्या मालकीचं होईल. हे पाखरू माझं आहे. “

तोपर्यंत बुध्दानं जीव धरलेल्या पाखराला मुक्त केलं पक्षावरची मालकी, बुध्दानं पक्षाला स्वातंत्र्य देऊन साजरी केली.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView