वेदकाळचे दलित प्रेम

Date: 
Sun, 28 Aug 2011

मेधातिथीचा चेहरा खर्रकन उतरला. समोर त्रिशोका उभा होता. कमरेवर हात ठेवून. विजयाने फुललेला. सार्थकतेनं संतुष्ट झालेला.
जैमिनीय ब्राह्मणात दिलेली ही गोष्ट आहे.
त्रिशोकाची आई हलक्या कुळातली आहे, असे काही अडाणी निंदक समजत. त्रिशोका हुषार होता. त्या काळात हुषारी गुणावरून ठरत असे, जन्मावरून नाही. पण तथाकथित उच्च जातीत, क्षुद्र मनाचेही लोक असतातच. त्यांच्या लेखी त्रिशोका हीन होता, तुच्छ होता. हलका होता. त्याचे मित्र चिडवीत, “तुझं नावसुध्दा तीनदा शोक करण्याच्या लायकीचे आहे. तू कसला दुर्देवी!!“
त्रिशोका वेदपारंगत होता, आणि स्वत:ला उच्च कुळातला समजणारा मेधातिथी, वेदापेक्षा भांडणातच तरबेज होता. त्याने त्रिशोकाची जन्महीनता काढली, तेव्हा त्रिशोका शांतपणे म्हणाला, “आपण निखाऱ्यावरून चालत जाऊ. मग तुला कळेल, की मीच मोठा आहे. “
मेधातिथीने ते आव्हान पत्करले. छसरलेल्या निखाऱ्यावरून चालत गेलेला त्रिशोका पहिल्याच चटक्याला मागे हटलेल्या मेधातिथीकडे पाहात, ऐटीने उभा राहिला.
रथस्पा नदीवरून पाण्याचा स्पर्शही न होता त्रिशोका जिंला. मेधातिथीने पुन्हा मेख मारली, “तू एवढा शूद्र आहेस की तुला पाणीसुध्दा स्पर्श करीत नाही, एवढाच त्याचा अर्थ. “
मग मात्र त्रिशोकाने अखेरचे आव्हान फेकले. त्याने सुचविले की, सामरचना केल्यावर जास्त गाई कोणाकडे येतात ते पाहू.
त्रिशोकाच्या लयबध्द, तेजस्वी सामरचनेने त्याच्याकडेच अधिक गाई धावून आल्या. मेधातिथीला बोलायला तोंडच उरले नाही.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView