वेदनाहारक ॐ

Date: 
Sun, 5 Apr 2015

पुरावा क्रमांक 49: वेदनाहारक ॐ
मागल्या पुराव्यात आपण आजाराचे उदाहरण घेतले. कण्हण्यामध्ये आजारी मनुष्य ओंकार अनुस्युत ठेवतो. पण मनुष्याला दुख:दायक आजारापेक्षा छोट्या तक्रारी अधिक वेळा होतात. त्यावेळी तो जो उद्गार काढतो, त्याला आपण ‘उसासे‘
म्हणतो.मनुष्य उसासे टाकताना ओंकारासमानच उच्चार करतो, “हुँ ऽ ऽ ऽ म् म्”अशा कसल्यातरी तऱ्हेचा तो उच्चार असतो. आपण पुरावा सहामध्ये पाहिल्याप्रमाणे ‘ह’हा नैसर्गिक श्वासाबरोबर येतो म्हणून आजाऱ्याचा उद्गार येतो तो ओंकाराप्रमाणे ठरतो. नादामध्ये वेदनाहारकता आहे आणि त्यातही ओममध्ये प्रकर्षाने आहे, हा आणखी एक निष्कर्ष येथे हाती लागला. ख्रिस्त सुळावर जात असताना त्याने अशा प्रकारचा ध्वनीच वापरला होता, हे आपण चाळिसाव्या पुराव्यात पाहिले.

पुरावा क्रमांक 50: उच्चार आणि रंगछटा
ओमचा उच्चार करताना शक्तिव्यय होतो, हे गृहित धरलेले असते. म्हणून ओंकारावर ध्यान धरणे आणि अखेर ते ध्यान करणे, ही अधिक उच्च अवस्था प्राचीनांनी सांगितली. उच्चार करावयाचाच तर तो ओमचा. नाही तर “मौनं स्वर्वस्व साधनम्”हा प्राचीनांचा विचार होता. आणि त्या मौनाचे स्वरूप प्रतीक, शून्य बिंदूत धरले आहे. प्राचीन ऋषीमुनींनी रंगवलेला ओम उपलब्ध नाही. पण असता तर तो आपण पूर्वी पाहिलेल्या पुराव्याच्या आधारापेक्षा निराळा नसता. याचे एक उदाहरण आपणास मिळेल. ते उदाहरण ‘सायकॉलजिकल रिसर्च इन यू.एस.एस.आर’ या ग्रंथातील आहे. पान दोनशे पंचेचाळीसव पांढरा रंग ‘ए’प्रमाणे, तांबूस रंग ‘यू’प्रमाणे व निळसर रंग ‘एम’ प्रमाणे म्हटला आहे. ‘AUM’ चा ओमअसा स्वयंसिध्द आहे. व तो आपण पंचेचाळीसाव्या पुराव्यात पाहिला आहे. याचा आणखी संदर्भ पुढील पुराव्यात पाहू.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView