वेदमंत्र

Date: 
Sun, 2 Nov 2014

वेदमंत्र
असे असले तरी ओमचे सामर्थ्य वेदात प्रत्ययकारी झाले असे समजण्यास प्रत्यवाय नाही. प्रथम वैदिक कर्माच्या आधी ओंकार आला. तीच पध्दत पुढच्यांनी उचलली.

आख्यायिका
ओमवर पुष्कळ आख्यायिका आहेत.
छांदोग्य उपनिषदात एक गोष्ट आहे. मृत्यूच्या भयाने देवांनी त्रयी विद्यांचा (वेद) आश्रय घेतला. पण मृत्यूने तेथेही त्यांना शोधले. तेव्हा देव ओमच्या आश्रयाला गेले. सुरक्षित झाले. कारण मृत्यूला ‘ओम’ अजिंक्य होता. तिसरी आख्यायिका केनोपनिषदात पर्यायाने सुचविली आहे, असे आचार्य विनोबा आपल्या उपनिषदांच्या अभ्यासा पान 5वर म्हणतात. केनोपनिषदात तसा स्पष्ट उल्लेख वाटत नाही. दूरान्वयाने मानावयाचा तरी आख्यायिक देतो. एकदा असुरांशी लढताना देवांना जय मिळाला. पाठोपाठ गर्व आलाच. ही प्रौढी पाहून ब्रह्म एक विलक्षण यक्षाचे रूप घेऊन देवांच्यापुढे ठाकले. देव गोंधळले. देवांपैकी अग्नीला त्या यक्षाने त्याचा प्रभाव विचारला.

अग्नी म्हणाला, “मी सर्व काही जाळू शकतो. “
यक्ष म्हणला, “जाळ ही काडी”
अग्नी सर्व सामर्थ्याने पेटला. काडी जळेना. मरूताची पाळी आली तेव्हा त्याने आपले सर्व सामर्थ्य म्हणून “मी सर्व काही उडवून देऊ शकतो” म्हणून सांगितले.
पुन्हा तीच काडी वायूच सोसाट्यासमोर उभी ठाकली. रेसभर हलेना. इंद्र आला. तेव्हा यक्ष अदृश्य झाला. आणि इंद्राला त्याच वेळी प्रकट झालेल्या यक्षाने ब्रह्मरहस्य संागितले. शंकराचार्यांनी आपल्या भाष्यात (केपोपनिषद खंड चार: सहावरील भाष्यात) ‘तद्वन’मधील ‘वन’चा अर्थ लावतान ‘चांगल्या तऱ्हेन भजन करणे” असा लावला. त्याला ‘प्रणव’चा अर्थ जुळत असल्याने ही आख्यायिका ‘ओम’ ला लावलेली दिसते. आचार्य विनोबंनी समन्वय करताना ‘उमा’ने ब्रह्म विषद केले आणि ‘उमा’ या शब्दात ‘ओम’ चे उच्चार बव्हंशी येतात म्हणून ही कथा ओमची आख्यायिका म्हणावी लागले, असे सुचविले आहे.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView