वैज्ञानिक दृष्टीकोन

Date: 
Sun, 16 Nov 2014

‘र’या अक्षराच्या उच्चाराने लघुलहरी निर्माण होतात. दीर्घ लहरी उत्पन्न करणाऱ्या उच्चारात ‘अ’आघाडीवर आहे. त्या खालोखाल ‘उ’ नंतर ‘म’ . विज्ञना आणि अनुभव अतूट आहेत. म्हणून सोप्या शब्दात सांगावयाचे तर ‘अ’उच्चारावयाला शक्ती किती कमी लागते? ‘र’ मुलांना बहुधा उशिरा उच्चारता येतो. ‘अ’ सर्वात आधी. “प्रार्थना विज्ञान कोश” प्रास्ताविकात - प्रश्र्नोत्तरे 16,7, आणि प्रश्र्नोत्तर 27, मुद्दा 4 मधील संदर्भ ध्यानात घेतले तर साधनेच्या सुरुवातीला ‘ओम’ चे महत्त्व किती आहे हे लक्षात येईल. शक्ती कमीत कमी खर्च होऊन; साधकाला प्राथमिक अवस्थेत, एकचित्त होण्याला ओमची मदत यामुळे मिळते. एका बाजूने ओम, दुसऱ्या बाजूने ‘राम’ या उच्चारात यामुळेच शक्ती गोवलेली दिसते. त्यात ओमचे महत्त्व प्राथमिक आहे ते वरील सिध्दान्ताने.
अनुभव वैज्ञानिक असता. नव्हे, सार्वत्रिक अनुभवाचेच विज्ञान बनते. दु:खमुक्ती आणि ओम् यांचा संबंध आपण नकळत बनवलेला आहे. अ, उ, म् मध्ये जी अक्षरे आहेत तीच आपण आपल्या दु:खविरोध उच्चारात मिळतात. उदाहरणार्थ, कण्हण्यात आपण सतत अुं, अुं, अुं, अुं म्हणतो किंवा ओऽऽ उद्गारतो. यातील व ओममधील साम्य बोलके आहे. अशा ओंकारयुक्त कण्हण्याने दु:ख कमी होते, त्याशिवाय तो सहजोद्गार कशाला निघाला असता?

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView