शास्त्रीय उपपत्ती

Date: 
Sun, 26 Oct 2014

1. शास्त्रीय उपपत्ती
ओम हे अ, उ, म व अर्धमात्रा व बिंदू यांच्या संयोगाने तयार झाल्याचे मानण्यात येते. ओमला म्हणजे ओंकाराला, प्रणव हा पर्यायी शब्द आहे. प्रणव म्हणजे ‘श्रेष्ठ, प्रगाढ स्तुती’असा होऊ शकेल. कारण, ‘प्रणव’ हा शब्द ‘नु’ म्हणजे स्तुती करणे या धातूला ‘प्र’हा उपसर्ग लावून तयार झाला.

2. लक्षणार्थ - पर्यायार्थ
‘ओम’ मध्ये ब्रह्मा-विष्णु-महेश यांची लक्षणे, म्हणजेच त्यांच्या शक्ती एकवटलेल्या मानतात. तीन वेदांचे द्योतक म्हणून ओंकार मानला जातो. त्रिलोकाचे पुण्य ओंकारात साठवलेले मानतात. ‘उद्गीथ’कल्पनेने ओमचे वर्णन छांदोग्यात आहे. प्रश्र्नोपनिषदात ‘अ उ म’ पैकी ‘अ’पृथ्वीसमान लेखिले आहे. मांडुक्योपनिषदात सुरुवातीलाच ‘ओम’ ला भूत-भविष्य-वर्तमान आणि तिन्ही संज्ञातीत असे म्हटले आहे. अ, उ, म चा अर्थ अनुक्रमे प्राप्ती, उत्कर्ष व नाश किंवा प्रीती असाही केला जातो. ओम लक्षणे अशी विविध विस्तारी आहेत. हजारो वर्षे अन्वयार्थ लावले जात आहेत. ज्ञानेश्र्वर महाराजांनी ‘ओम’ ला गणेशाशी एकरूप केले.
“अकार चरणयुगुल। उकार उदर विशाल। मकार महामंडल मस्तकाकारे।। (ज्ञानेश्र्वरी अध्याय1, श्लोक 19)

3. प्रथमात्पत्ती
ओमची उत्पत्ती प्रथम वेदात दिसते, हे विश्लषणकारांचे म्हणणे ‘बीज वृक्ष संभ्रम’ न्यायचे आहे. ओमपासून विश्र्वाची उत्पत्ती मानली तर ओम प्रथम वेदांकित झाला हा संभ्रम म्हणावा लागेल. वेद अपौरूषेय म्हणून हे कोडे सुटेलच असे नाही. कारण वेदापलिकडे अज्ञाताची कथा, त्यात अधिक पुरातन ओम ठरेल असे वाटते. कारण ओमला साक्षात् ब्रह्मरूप ज्ञात्यांनी दिले.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView