शुद्र मुलींची मुंज

Date: 
Sun, 3 Mar 2013

ती बातमी वसंताने मामींच्यसमोर मुद्दाम वाचून दाखवली. मामा यावर फारसे चिडणार नाहीत हे वसंताला माहीत होते. मामींनी वसंताच्या हातातले वर्तमानपत्र घेतले आणि भडकलेल्या स्टोव्हच्या वर धरले. वसंता खो-खो हसत सुटला. पण त्यासाठी मामींना वसंतावर भडकायची सोय नव्हती, म्हणून त्या मामांच्यावरच कडाडल्या “उद्यापासून असल्या बातम्या छापणाऱ्याचं वर्तमानपत्र बिलकूल आणू नका. “

वसंता तेल ओतत म्हणाला, “लोणावळ्याच्या जबाबदार संस्थेने केल्या आहेत मामी मुंजी. “
“आग लागो त्या जबाबदारील. असल्या बातम्या छापणारं मी सगळं जाळून टाकीन. “
मामा उठले. फळीवरचे सहा धर्मग्रंथ त्यांनी काढले. आणि मामींना म्हणाले, “हे आधी जाळा. तुझे हे सगळे आवडते ग्रंथ आहेत. त्यात लिहिलं आहे, की प्रत्येक माणूस जन्मल्याबरोबर शुद्रच असतो, अंत्यज असतो. मुंज झाल्यावर तो दुसऱ्यांदा जन्मता, म्हणून त्याला ‘द्विज’असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक मुंज शुद्राचीच व्हावी लागते. “

मामींना काय बोलावं ते सुचेना. त्या अवाक् होऊन पाहात राहिल्या. तेवढ्यावर भागायचं नाही, हे मामंाना माहीत होतं. त्यंानी भराभरा एका पुस्तकाची पानं उलगडली आणि नेमका उतारा काढून मामींच्या पुढे ठेवला.

मामी सोवळ्यात होत्या. त्यांनी तो उतारा चष्मा लावून लांबूनच वाचला. पण वाचला.
मामी तोंडावर हात ठेवून म्हणाल्या, “नवलच वाचते बाई!”
मग पुन्हा एकाएकी त्यांचा स्वर चढला. त्यांनी उसळून विचारलं, “पण मुलींची मुंज? मुंज कधी मुलींची होते? “

मामांनी महामहोपाध्याय काण्यांच्या पुस्तकातलं अवतरण काढलं आणि मामींच्या पुढे धरलं. मुलींची मुंज करायला शास्त्राची परवानगी होती.
विझत आलेला वणवा वसंताला संपवायचा नव्हता. तो आपला प्रयत्न पुढे रेटत म्हणाला, “मामा, तुम्ही खूप तयार व्हाल. आजचे शुद्र तयार होतील का मुंज करून घ्यायला? “
मामानंी डाव्या हाताचा ताल उजव्या हातावर धरत म्हटलं,”मी कोणालाच शूद्र मानत नाही. जन्माला येणारा प्रत्येक अज्ञानी असतो. तो ज्ञानी होण्याची इच्छा करण्यासाठी गुरूकडे जातो. म्हणजेच त्याची मुंज होते. “
“बस!एवढं पुरतं?”

“होय पुरतं” हा संदर्भ वाचून पाहा. मुंजीचा अर्थ तेवढाच होता. याबाबतीत त्या बातमीमध्ये दिलेल्या उपक्रमात भर फक्त एवढीच होती, की ज्ञान घेण्याच्या प्रतिज्ञेबरोबर गरीबांची काही सेवा करण्याचीही प्रतिज्ञा घ्यायची. ज्ञानाचं वर्धन आणि मौजेवर बंधन म्हणजे मौंजीबंधन. हा व्रतबंध ज्ञानकर्तव्यशुध्द क्रांती होईल. धर्म वाचेल. मानवता धर्मसुध्दा.
एका दगडात दोन पक्षांचा पक्षाघात होऊन बसला. मामी स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या आणि वसंता बाहेर जाण्याच्या.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView