शेवटचा सवाल

Date: 
Sun, 22 Jan 2012

ती अखेरची संध्याकाळ होती.
महंमद पैगंबर साहेबांच्या आयुष्यातील संध्याकाळचा असा अखेरचा नमाज होता. देवकार्य संपल्याची, आपल्या हातून पुरे झाल्याची जाणीव पैगंबर साहेबांना होती. ऐकणाऱ्यांना ती नव्हती. पण आपल्या प्राणप्रिय नेत्यावर आलेली गंभीरतेची छटा नकळतच त्या अफाट समुदायावर पसरली.
जसा काही अखेरचा उपदेश आणि निरवानिरव करावी, असा पैगंबर साहेबांच्या बोलण्याचा थाट होता.
हात उंच करून त्यांनी मोठ्या आवाजात विचारले, “एक प्रश्र्न आहे. मी कोणाचे काही देणे लागतो का? “
कोण बोलणार? ज्यांच्या शब्दासाठी करोडो दिनार, करोडो नाणी खर्च झाली तर स्वत:चे पुण्य घडले, असे मानणारे मातब्बर समोर होते. तेव्हा अशा प्रश्र्नासमोर कोण घेणेकरी उभा राहणार? पण महंमदांनी पिच्छा पुरवला. त्यांनी पुन्हा अधिक मोठ्या आवाजात विचारले, “खरा जबाब द्या. मी कोणाचे काही देणे लागतो का”
मागल्या रांगेतून एक माणूस लटपट उठला. म्हणाला, “त्या दिवशी कोपऱ्यावरच्या गरीबाला देण्यासाठी एक फादेम तुम्ही माझ्याकडून मागून घेतला होता. “

त्या बोलक्या तोंडाला बंद करण्यासाठी, त्याला खाली खेचण्यासाठी शेजारी उठले. पैगंबर साहेबांनी त्यांना ताबडतोब बसण्याची खूण केली. जवळचे नाणे त्या समोरच्या वक्त्याकडे पोहोचवले. आणि आजूबाजूच्यांना ते म्हणाले, “वर गेल्यावर मान खाली घालण्याचा प्रसंग येण्यापेक्षा इथेच तो आलेला बरा. “
हिशेब चुकता करून जाण्याची ज्ञात्यांची ही धडपड अपूर्व असते. स्वार्थासाठी येथे चुकवलेला प्रत्येक पैसा अखेर सोन्याच्या ताटाची परतफेड मागतो.
देवाची दुर्बिण पापाचा कणही पाहू शकते.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView