संसार सुखाचा वार शुक्रवार

Date: 
Sun, 17 Feb 2013

शुक्रवारचा शुक्र हसत सुटला. शेजारचा बुध ग्रह किंचित् उखडून म्हणाला, “ही, माणसं आम्हाला काय निर्बुध्द समजतात काय?”
आकाशत जमलेल्या ग्रहांचा निरोप घेऊन पृथ्वीवर येण्यापूर्वी निघालेल्या नारदांनी, शुक्रवारची अधिदेवता जो शुक्र, त्याची माहिती सांगताना आधीच म्हटलं होतं की शुक्रार हा स्त्रियांचा खास आवडता वार आहे. युरोप आणि अशिया हे पृथ्वीवरचे दोन खंड, एरवी भांडतील पण याबाबतीत एक. पाश्र्चात्य देशात शुक्राला सौंदर्याची देवता, व्हीनस असे समजतात. तर भारतीय ज्योतिषशास्त्रात शुक्र हा सौंदर्याचा आणि पत्नीचा कारक मानला आहे. स्त्रिया त्या दिवशी नवी वस्त्रं घालून देवीचं दर्शन घेतात.
बुध चिडून शुक्राला म्हणाला, “तू फुशारून जाऊ नकोस, हे आपलं बायकांचं निमित्त असतं, हमखास शुक्रवारी नवं वस्त्रं मिळावं, म्हणून. पण आठवड्याच्या इतर दिवशीसुध्दा नवी वस्त्रं घ्यायला त्यांची ना नसते. “
पथ्वीवरल्या व्रती स्त्रियांचीसुध्दा ओळख असलेले नारद मध्ये पडून म्हणाले, “शुक्रवार हा देवीचा वार म्हणून मानला जातो. देवीची उपासना हा शुक्रवारचा विशेष असतो! तिला अर्पण करायचं म्हणून वस्त्रं-प्रावरणं घेतात. एखादं जास्त स्वत:साठी घेतलं तर काय बिघडलं? वस्त्रं आणि अलंकारांची हौस भागवायची असेल तर, पृथ्वीवर एक शुक्राचा मंत्रच म्हटला जातो.
“ॐ वस्त्रं मे देहि शुक्राय स्वाहा!! “
असा हा एकाशाक्षरी मंत्र आहे, याचा ऋषी, ब्रह्मा, छंद विराट्, देवता शुक्र, बीज ॐ व शक्ती स्वाहा आहे. “
“स्वाहा? दृवाहा म्हणजे काय?”शेजारच्या शनी ग्रहानं विचारलं.
नारदांनी खुलासा केला, “स्वाहा हीसुध्दा एक देवी आहे. देवीची कृती आहे. अग्नीचं एक प्रतीक आहे. ‘देवी भागवतात’ तिची एक कथा आहे. यज्ञातला अग्नी जेव्हा देवाना त्यांचा भाग पोचवेना, तेव्हा ते काम स्वाहा हिनं केला. म्हणून हवन करताना, ‘स्वाहाकार’ म्हणतात. त्यागाचं, त्याग पोचविण्याचे हे देवतास्वरूप प्रतीक आहे. शुक्रवार हा असा चहुबाजूने देवीपुण्यानं वरलेला. योग्य व्रत केलं तर, त्याचं फळ मिळेल. त्या व्रतासाठी शुक्रवार निवडला तर काही वाईट नाही. “
शनीनं विचारलं, “पण विशेष चांगलं तरी काय?”
नारद म्हणाले, “प्रत्येक वार हा एकेका देव-देवतेसाठी निवडला आहे. त्याचा उपयोग एकाग्रतेसाठी होतो. आणि दुसरं म्हणजे एकाग्रता सामर्थ्यामुळे होतो. अनेक भक्त एकाच लक्ष्याची पूजा करतात. समविचारशक्ती प्रकट होते. हल्लीच्या विज्ञानात त्याला ‘रेझोनान्स’सारखं म्हणता येईल. “

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView