सम्राट अशोकाची नम्रता

Date: 
Sat, 26 May 2012

तो वैभवशाली दरबरा, दिमाखाने उजळून निघाला होता. देशोदेशीचे विद्वान, मांडलिक, व्यापारी एकामागून एक दरबारात आपली हजेरी लावत होते. कोणी मागत होता. कोणी देत होता. ज्याला त्याला आपापल्या न्यायाप्रमाणे मिळत होते.
सम्राट अशोक आपल्या सिंहासनावर स्थित होते.
आणि ते एकाएकी उठले. वास्तविक त्यांनी उठावे असा आदर मिळविणाऱ्या लायकीचा, एकही राजा नव्हता. कारण ते राजांचे राजे होते. सम्राट होते. त्यांना उठवू शकणारा कोणी राजा नव्हता. अर्थात् तसा काणी व्यापारीही असू शकत नव्हता. विद्वानांना देण्यासाठी, हातांचे उंच होणे पुरेसे असते. मग स्वत: सम्राट कशासाठी उभे होते?
दरबारात एक भिक्षु येत होते. पीतवस्त्र भिक्षू. मुखावर विद्वत्तेचे तेज. पायांत काहीच नाही. आणि डोक्यात सर्वच काही आहे. अशी ती दमलेली मूर्ती, सिंहासनाच्या दिशेने एकेक पाऊल पुढे टाकत राहिली.
सम्राट अशोक ताडकन उभे राहिले आणि सरदार दरकदार लगबगीने बाजूला झाल्यावर, मोकळ्या
झालेल्या वाटेने भिक्षूपर्यंत पोचले. ते खाली वाकले. चिखलातून चालत आलेले ते पाय, काट्यांनी ओरखडल्यामुळे चिखलात रक्त मिसळलेले ते पाय, त्यावर धुळीची भुकटी पसरल्यामुळे धुरकट झालेले ते पाय, सम्राटांना नि:संकोचपणे धरले. भिक्षूने दिलेला मंत्रमय आशीर्वाद सम्राटांनी स्वीकारला. आणि त्या विद्वान भिक्षूचा यथासांग सन्मान करून, तो गेल्यावर दरबाराचे काम पुढे सुरू झाले.
संध्याकाळी निवडक दरबारी असताना प्रधानानी आपली डोकी मनातून मोकळी केली. अमात्य म्हणाले, “सम्राट आपण आपले पुण्यवान मस्तक, क्षुद्र भिक्षूच्या पुढे नमवित असता, हे काही इतके बरे नाही. “सम्राट अमात्याना काही बोलले नाहीत. बाजारातल्या एका व्यापाऱ्याला त्यांनी बोलावले. व्यापाऱ्याला विचारले, “तू पेंढा भरलेली, शोभेची म्हणून, मेलेल्या जनावरांची मस्तके विकतोस. तर शेळीचे केवढ्याला विकतोस? “
व्यापाऱ्याने उत्तर दिले, “एका मोहोरला, महाराजधिराज? “
सम्राटांनी विचारले, “चित्त्याचे केवढ्याला? “
“वाघाचे? “
“पंचवीस मोहोरांना”
“सिंहाचे? “
“पन्नास मोहोरांना”
“माणसाचे? - समजा माझे? “
व्यापारी तर चमकलाच. पण ऐकणारे अमात्यही दचकले. व्यापाऱ्याला काय बोलावे, हे क्षणभर सुचेना. पण शेवटी उत्तर द्यावेच लागले. तो म्हणाला, “सम्राट, माणसाचे डोके पैसे देऊन कोणी विकत घेतलेले मला आठवत नाही. “
सम्राट अशोक मघाच्या शंकीच अमात्याकडे पाहून म्हणाले, “असले एक क्षुद्र बिनकिं मतीचे मस्तक, त्यागी विद्वत्तेपुढे वाकवण्यात त्या मस्तकाचा अपमान नाही, मानच आहे. “
मान खाली घालण्याची पाळी अमात्याची होती.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView