सर्पानं शोषली शांती

Date: 
Wed, 7 Mar 2012

सूर्यगोल आकाशात घरंगळायला लागला. तसा दिवस उलगडत राहिला. ऊन फार चढलं नव्हतं, तरी उन्हानं सगळी सृष्टी वढायला सुरुवात केली होती. उन्हाच्या उगवत्या झळा त्या भव्य वटवृक्षाच्या भोवती फेर धरायला लागल्या होत्या.
वैशाली पाटण्यापासून चौदा कोस दूर. तिथला राजा सिध्दार्थ आणि राणी त्रिशला. त्यांच्या पोटी आलेला पुत्र वर्धमान. तो स्वत:च्या नशिबानं मिळालेल्या शक्तीवैभवाचा त्याग करून आत्मशोधाचं तप करीत, परकल्याणासाठी तप करीत रानोमाळा हिंडत होता. तशा एका रानाच्या सीमेवर हे वडाचं झाड होतं.
त्या विशाल वटवृक्षावर विश्रांती घेत होते महावीर. ही पदवी होती; वर्धमानाची. त्यांच्या वैराग्यावर, तपाच्या निष्ठेवर, शौर्यावर भाळून त्यांच्या शत्रूंनीच त्यांना ठेवलेलं महावीर हे विशेषणात्मक सत्‌नाम होतं. अर्थात मग ते नाव देणारे त्यांना शत्रू म्हणून उरलेही नव्हते.
त्या दिवशी सकाळी वर्धमानांची परीक्षा घ्यायला आले होते संगमदेव. संगमदेवांचं रूप साधं नव्हतं. वर्धमानाची जणू परीक्षा घ्यायला आलेल्या कराल परीक्षकाचं ते रूप होतं
- सर्पाचं.
सरसरता, वळवळता, प्रचंड, महाकाय, महारुद्र, अजस्त्र. असं ते तळपतं तेज विषाचे श्र्वास फुत्कारत वर्धमान बसले होते, त्या वटवृक्षाभोवती वेटोळं करू लागलं.
भित्रा भयानं गर्भगळीत होऊन जावा, आणि दुसऱ्या टोकाला एखादं संतापाचं संतान भडकून उठावं असं हे सर्पाचं भीषण आव्हान, पुढे खडं होतं.
पण वर्धमानांची प्रतिक्रिया भयाची नव्हती आणि रागाचीही नव्हती.
आपल्या समाधीतून त्यांचे डोळे यथाकाल उघडले. पापण्यांच्या झडपाखाली झाकलेली दोन नेत्रांची शंात सरोवरं, समोरच्या विषडोलानं मुळीच गढूळली नाहीत. मुखावर राग नव्हता, भय नव्हतं. इतकंच काय पण धैर्याचा देखावाही नव्हता. होती ती नीरव अशी शांती.
दुसऱ्याला भीती घालण्याची इच्छा करणारा कराल कौरव समोर निर्भयता पाहिली की अधिकच चिडता. तेच झालं. समोरचा ता सर्पदैत्य. वेगानं वळवळू लागला. ‘मरुत-वेगाचे’ फुत्कार टाकायला त्यानं सुरुवात केली. वर्धमान अधिक शांतीप्रसन्न होत गेले.
परिणाम एवढाच झाला की तो डोलता विषकुंभ आणखी वेगावला, आणखी संतापला. आणखी हतबल झाला.
वर्धमानांच्या डोळ्यातली शांती बदलली. तिची जागा करुणेनं घेतली. आक्रमक शत्रूचे हाल पहाण्याचा अलिप्तपणा, त्या सौजन्य-सम्राटाला सोसला नाही. त्यांच्या डोळ्यातून करुणेचे अश्रू पाझरू लागले.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView