सीता:

Date: 
Sun, 8 Jun 2014

वैज्ञनिक अर्थ: ‘सीता’ह्या नामोच्चारात सुरुवातील लघु-लहर-तरग व लांबी शक्ती उद्भवते. नंतर मध्यम लहर-तरंग लांबी घेऊन तो नामोच्चार पुरा होतो. दोन्ही शक्तीचा समतोल सीतेच्या नामोच्चारात चांगला साधला आहे. राम-नामात असाच समतोल असला, तरी सुरुवातीची प्रखर शक्ती, ‘रामापेक्षा’ ‘सीता’मध्ये सौम्य झाली आहे.

सांस्कृतिक अर्थ: सीता म्हणजे नांगरलेली जमीन. ह्या अर्थाने ऋग्वेदात उल्लेख येतो. (4-57) (6-7) नंतर दुसरे उल्लेख अथर्ववेद, तैतरिय संहिता ह्यात येतात. तेथे तिचे रूप कृषि देवतेप्रमाणे दिसते. रामायणात जनककन्या म्हणून तिचा रामाशी विवाह लागला. परंतु जनकाला भूमीनेच ती कन्या दिली, असे समजतात. दिव्य करतानाही सीतेला भूमीनेच दोषमुक्त केले. म्हणजे भूमीशी तिचा संबंध ह्या ना त्या स्वरूपात सुटला नाही. कृषिप्रधान हिंदुस्थानात सीतेचे भूमीकन्यापण तिच्या आदरात भर टाके. निष्ठा आणि त्याग ह्यांचे पावित्र्य सीतेला महामंगल करून गेले.
उपयोग: रक्तविकार, नसांचे विकार, वातव्याधी, प्रसूती रोग, बाळंतपणाचे रोग ह्यावर सीतानाम फायदा पुष्कळ देईल. आधार सुटल्यामुळे आलेले कौटुंबिक संकट, अपमान, अवहेलना प्रसंग, अन्यायाचे प्रसंग इत्यादी प्रसंगात ह्या नामोच्चाराचा लाभ होईल. पूर्वी वारंवार उल्लेख केलेले कर्मशुध्दी प्रयोग किंवा व्रते ह्यामुळे नामोच्चार फलदायी होईल.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView