सूर्याने धरली सावली

Date: 
Sat, 3 Nov 2012

ज्याला आज तुम्ही पॅसिफिक महासागर म्हणता, त्याच्या उत्तर माथ्यावर काही युगापूर्वी ते अपूर्व घडलं. जपानचा शिंटो धर्म, पूर्वेकडला सूर्य उगवला, त्यावरची सोनेरी कथा.
वरच्या अवकाशाच्या विशाल विवरातून तीन देव अवतरले. चंद्रदेव, सूर्यदेव आणि वादळदेव. म्हणजे शांती, औष्णिक शक्ती आणि वेगशक्ती यांची तीन प्रतीकं.
किरणांच्या मखमली पायघड्यांवरून शंाती आणि वेगोची ती वादळं, तरंगत्या जलरत्नावर उतरली.
विस्तारकार्य सुरू झालं. इझानागी आणि इशानामी या दोन मूळ देवंाचे तीन पुत्र; चंद्रदेव, सूर्यदेव आणि वादळदेव.
कालपुरूष गुणाकार करीत होता. तिसरी पिढी जन्मली. तिनं जपानला पहिला सम्राट दिला. जिम्मुनेन.
आपल्या लाडक्या नातवाचा निरोप घेतालना सूर्यदेव म्हणाला, “तेजानं राज्य करं. पण तुझ्या दोन काकांना विसरू नकोस. योग्य तेव्हा निष्ठूरपणानं वाग. आणि निष्ठूरपणाचं कारण संपल्यावर, शांतीनं वाग. “

सूर्य लहानग्या जिम्मुला हे सांगत होता, तेव्हा त्याच्या बाजूला वादळदेव आणि चंद्रदेव उभे होते. वादळदेव आपला काका आहे, हे माहिती असूनसुधदा, जिम्मुला त्याच्या उग्रतेची भीतीच वाटली.
चंद्रकाकाच्या तोंडावरची शांती त्याच्या मनाला आसरा देऊन गेली.
जिम्मु किंचित् गोंधळून गेला. त्याला आत्मविश्र्वास होता. पण त्याचे कर्तबगार आजोबा एकाएकी दूर चालले होते. त्याच्या मनात खळबळ होणे साहजिक होतं. तो म्हणाला, “आपण रोज मला अर्धा दिवस सहाय्य करायचं कबूल केलं आहे. म्हणूनच मी जबाबदारी घेतो आहे. मी कसा वागू म्हणजे आपणास संतोष वाटेल? “
सूर्यदेव म्हणाले, “तू साम्राज्य स्थापन कर. सामुदायिक परंपरा स्थापन कर. साम्राज्या म्हणजे जुलुमाचं राज्य नाही, समानतेचं राज्य ‘साम राज्य’ जिथे प्रत्येक राईमध्ये न्याय, शांती, समता असेल ती सामुदायिक परंपरा, म्हणजे सामुराई. त्या परंपरेतलं तुझं शौर्य न्यायाच्या रक्षणासाठी वापरशील तोपर्यंत माझं, आणि जरूर तेव्हा शांती आणि वादळाचं तेज, तुझ्या पाठीशी सदैव राहील. “
लहानगा जिम्मु संतोषानं हसला. त्याला आत्मविश्र्वास होता. त्याला हवं ते मार्गदर्शन मिळालं होतं. पुढल्या अनेक पिढ्यांना पुरेल एवढं विचारधन तेजदेवानं त्याच्या हवाली केलं होतं.
किरणांच्या विमानात आरू ढ होऊन मागे जाण्यासाठी पाऊल उचलेल्या सूर्यदेवाला वंदन करून छोट्या जिम्मुनं विचारलं, “काकांना तरी इथं राहू दे. “
सूर्यदेव हसून म्हणाले, “अगदी जवळ नको. थोड्या दुरून तुझा चंद्रकाका तुझ्यावर नजर ठेवील. वादळकाका मात्र मी इथं ठेवून जातो. चांगला वागशील तेव्हा तुझा तो मित्र असेल. वाईट वागशील तेव्हा तो तुझ्या शत्रूचा मित्र असेल. “
जिम्मुनं वादळकाकाकडे हळऊच वळून पाहिलं. वादळदेवंाच्या मुखावर मिष्किल हसू होतं, पण ते जिम्मुला आश्र्वासक वाटलं. तेज, शांती आणि वेग यांच्या परंपरेचा तो पहिला पुत्र पूर्वाचलावर उगवला. सूर्यपुत्र जपानला शिंटो धर्माच्या रूपानं सूर्याची सावली मिळाली.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView