हाडामांसाचा भक्त

Date: 
Sat, 17 Nov 2012

मूर्खपणाच्या व्याख्या सवडीने करायच्या असतात. परिणाम ताबडतोब भोगावयचा असतो.
तसा परिणाम भोगण्याची पाळी ‘नवनाथ भक्तीसार ‘ मधल्या वीरभद्रावर आली होती.
वीरभद्र श्री नाथप्रभूंच्या विरुध्द युध्दाला खडा झाला, तेव्हाच त्याचे भविष्य निश्र्चित झालं होतं. वीरभद्र हा कितीही वीर व भद्र असला तरी, श्री नवनाथप्रभूंच्यासमोर तो टिकायचा म्हणजे हिमालय पर्वताला, पुण्याच्या पर्वतीने टक्कर देऊन जिंकण्याची कल्पना. श्री नाथंाच्या सामर्थ्याने नुसत्या वीरभद्राचाच नव्हे तर असंख्य सैन्याचा संहार करून टाकला. वीरभद्राचे वागणे योग्य होते की नाही, हा त्या क्षणाला प्रश्र्नच नव्हता. गाठ होती श्रीनाथप्रभूंशी आणि त्यांच्यासमोर, सामर्थ्याऐवजी सामाचाच उपयोग अधिक झाला असता.
हा घनघोर संग्राम संपला, तेव्हा असंख्य सैनिकांचा सडा पडला होता. रक्तामांसात, हाडामासात, वैफल्याने विखुरलेल्या विळख्यात, कोणी कण्हत होते, कोणी किंकाळ्या फोडीत होते. पण बहुतेक सर्व याहीपलीकडच्या अवस्थेत नि:शब्द, निश्र्चल, श्र्वासापार जाऊन बसले होते.
एका पिपलवृक्षाच्या चरणशाखावर, श्री नाथप्रभु बसले. आणि त्यांना एकाएकी आठवण झाली ती शंभारूपाची. वीरभद्र हा शंभोचा मानलेला मुलगा. तो आज नाहीसा झाला.
ज्याला जिवंत करण्याचे सामर्थ्य असते, त्याला मारण्याचं पाप लागत नाही. श्री नाथप्रभूंना ती शक्ती हाती.
श्री नाथप्रभूंनी शिवाना म्हटलं, “वीरभद्राला जिवंत करायची इच्छा आहे. “
“करा. “शिवानं थंडपणानं उत्तर दिलं.
परमशक्ती ही नेहमीच लायकीच्या अलिप्त, न्यायगत भविष्याशी बंाधिल असते. भस्मासुरानं एका लोकविलक्षण लायकीएवढं तप केलं तेव्हा विश्र्वशक्तीला भस्मासुराच्या पदरात ‘वर ‘टाकावाच लागला. पण चुकीच्या हेतूनं झालेलं तप मिळालेल्या शक्तीचं, स्वत: होऊनच विष करतं. तसं भस्मासुरानं केल्याबरोबर, त्याचं निर्दालनही श्री शिवानंच केलं होतं.

श्री नाथप्रभूंनी अडचण सांगितली. ते म्हणाले, “इथं प्रेतंच प्रेतं पडली आहेत. नुसती प्रेतं नव्हेत, तर तुकडे तुकडे झाले आहेत. त्यातून तुमचा वीरभद्र ओळखायचा कसा? “
“ते सोपं आहे. “ शिवप्रभू म्हणाले, “या तुटलेल्या शरीरांच्यावरून कान फिरवा. ज्या हाडांतून, ज्या मांसातून, ज्या रक्ताच्या थेंबातून शिवनामाचा हुंकार येईल तो वीरभद्राचा अवयव समजा. “

करुणामय श्री नाथप्रभू उठले. अवघ्या काही कालक्षणात ‘शिवनामस्पंदना ‘ असलेल्या पेशी एकत्र करता आल्या. त्यातल्या प्राणाची फुंकर आतून निवली नव्हती. आणि वीरभद्राची ती एकरूप शिवप्रेममूर्ती, साकार झाली. छोट्या किल्मिषाचं प्रायश्र्चित्त भोगून झाल्यानंतर मेलेला भक्ती पुन्हा साकारतो, तर कडेकोट रक्षणांचा वर मागितलेला भस्मासूर स्वत:च्या पापभारानंच कोसळतो. त्या प्रतीकाची ही कथा. मृत्युंजय मंत्राच मर्म मात्र वरवरचं नाही.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView