Home » Weekly Story » हिऱ्याएवढे फळ
हिऱ्याएवढे फळ
Date:
Sun, 10 Nov 2013
चौथा हेन्री राजा एकदा शिकारील गेला होता. शिकार करता करता तो जंगलात वाट चुकला. तहानही खूप लागली होती. भूकही लागली हाती. एका दरिद्री झोपडीजवळ राजा थांबला आणि त्याने पाणी किंवा एखादे फळ मागितले. राजा साध्या कपड्यात होता. आणि त्याला चिखलही लागला हाता व धूळही लागलेली होती. तो राजा म्हणून ओळखू येत नव्हता. समोर पीचचे झाड होते. त्याला एकच सुरेख पीच लटकलेले होते. झोपडीच्या मालकाने ते तोडले आणि पाहुण्याच्या हातात ठेवले. राजा परत गेला आणि राजवाड्यातून त्याने देणग्यंाचा ढीग त्या गरीबाकडे पाठविला. एका पीचने केलेल्या परोपकारचे ते फळ नव्हते. किंमत होती ती नि:स्वार्थ वृत्तीची.