“मी आंबो चोरले माझे हात तोडा”

Date: 
Sun, 12 Oct 2014

लिखित ऋषी हे महान वेदाधिकारी!! राजाला पूज्य, समाजाला पूज्य, सर्व जन्मभर लौकिकाकडे पाठ फिरवून आपल्या अलौकित बुध्दीने, त्यांनी ज्ञानसाधना केली. त्यांच्या शेजारीच त्यांच्या भावाच्या वाट्याला आलेले माळरान फुललेले होते. भावाने ज्ञानमार्गाऐवजी कर्ममार्गावर अधिक भर दिला होता. चौफेर बागा लावल्या. अमाप उत्पन्न कमावले. आणि तो एक समाजोपयोगी सज्जन म्हणून समाजाला आदरणीय राहिला. आणि त्याचीही ज्ञानप्रेरणा काही कमी नव्हती.
लिखित ऋषी मंद मंद पावले टाकीत, आपल्या निष्कांचन आश्रमाच्या हद्दीकडून भावाच्या हद्दीकडे चालत होते. अनेकदा तसे ते चालत गेले होते. निसर्गाच्या भव्य फुलोऱ्याचा एक भाग, या पलीकडे लिखितांना त्याचे आकर्षण नसे. का कोणाला ठाऊक, आज त्यांची दृष्टी भावाच्या हद्दीत लावलेल्या, पण आपल्या हद्दीत डोलणाऱ्या एक आंब्याच्या डहाळीकडे गेली. दिवस अंाबे पिकण्याचेच होते. पण तया विशिष्ट आंब्यांना इतके भारंभार आंबे की, जणू सुवर्णाचे लोंगर त्याला लटकत होते. नुसत्या लिखितांच्या हद्दीत आलेल्या फंादीला, शेपन्नास असतील.
लिखितांची आपल्याकडे दृष्टी गेलेली पाहून आंबाही मोहरला. लिखित ऋषींच्या पोटात जाण्याचे भाग्य मिळाले तर धन्य, असे त्याला वाटणे साहजिकच होते. अखेर प्रत्येकाचा जीवित हेतू किंवा फळ, आपले साध्य शोधीत असते. जमिनीवर पडून नाश होऊन जीवन वाया जाईल, असे त्याला वाटते. त्यापेक्षा एखाद्या लायक माणसाला जीवन अर्पण करणे त्याला आवडते. (नालायक मनुष्य जबरीने तो आंबा तोडतो आणि आंब्याने मिळवलेली शक्ती उन्मत्तपणाने वापरतो. आंब्याचा आणि स्वत:चा दोन्हीचाही नाश. त्याहीपेक्षा राजा स्तब्ध झाला. त्याच्या तोंडून शब्द फुटेना. पण गाठ लिखित ऋषींशी होती. ज्या हातांनी अमोल ग्रंथसेवा झाली असती; ते हात आता तुटायचे होते. आणि त्याला कारण, त्याची स्वत:ची आज्ञा म्हणून!! कोणता राजा अशी शिक्षा उच्चारू शकेल? शासन करणे हाच रोजचा ज्याचा व्यवहार, त्या राजाला त्या क्षणाला, ते कर्तव्य म्हणजेच एक शासन भासू लागले.

राजाने न्यायाधिशांना खूण केली. न्यायाधिशांनी दंडाधिशांना, दंडाधिशांनी दंडसेवकांना. दंडसेवकांनी लिखितांचे दोन्ही दंड उचलले. त्यांची निर्दय हृदये एक क्षणभर बंड करून उठली. अशिक्षित मनुष्य जास्ती भावनाशील असतो. पण डोळे मिटून त्यांनी कर्तव्य केले. तलवारीची दोन पाती वर आली. लिखितांच्या देहावर ती लखलखती पाती उगारली गेली. छेद करून दुसऱ्या बाजूने बाहेर पडली. लिखित हस्तशून्य झाले होते. काही काळ संज्ञाशून्य.
लिखितांच्या देहापेक्षाही दरबार दु:खी झाला होता. नम्र झाला होता. राजाने गुडघे टेकले होते. लिखितांनी आपली मान लवविली आणि परतीची वाट धरली. भावापुढे जाऊन ते उभे राहिले, त्यांना झाले ते सांगितले.
बंधुराज निर्व्याज प्रसन्नतेने हसले. म्हणाले, “जा आता. समोरच्या नदीत जाऊन हातू धू; आंघोळ कर. “
लिखित नदीवर गेले. नदी ही पापे धूत असते असे भारतीय संस्कृती सांगते. लिखितांच्या बंधूचा अर्थ निराळा होता, पण तोच होता. प्रत्येकाने आपले पाप फेडायचे असते - बाहेरच ते फेडून झाल्यावर, वाहत्या निर्मळ जीवनसरितेला येऊन सांगायचे तेवढे असते की,

“आजपासून तुझ्यासारखे वाहते, जीवन उंच करणारे आयुष्य कंठीन. ते बळ मिळण्याचे तुझ्याहून मोठे स्थान कोठे मिळणार? “
याच भावनेने लिखितांनी नदीत प्रवेश केला. स्नान केले. त्यांनी बुडी मारली आणि ते वर आले तेव्हा त्यांना दोन्ही हात पूर्वीसारखेच आपापल्या जागी होते, असे दिसले.
पश्चात्ताप खराखुरा आहे का हे पाहण्यासाठी निसर्गाला नुसते शब्द पुरत नाहीत, तर दु:खाला न भिणारा पश्चात्ताप हीच निसर्गाची आवश्यकता असते. ती पुरी झाली म्हणजे निसर्गाला कोणाचे हिरावून घेण्याची इच्छा असण्याचे कारण नाही. आंबा सत्कर्मशाली पुरुषाला वाहून घेण्याची इच्छा करण्याची करत होता. नदी सत्कर्माचे प्रतीकच होती. राजा सत्कर्मशीलच होता; आणि लिखितांचे बंधूही - वर क्रूर दिसले तरी - सत्कर्मप्रचारकच होते. सत्कर्म म्हणजे गोड बोलणे नव्हे; तर त्यामागे प्रेरणा शुध्द हव्यात. प्रतिभा शुध्द हव्यात. मन वाहते हवे. जीवनदायी प्रभाव हे सगळे नदीशिवाय कोठून मिळेल?म्हणून नदीच्या निमित्ताने अनेकांचा उध्दार झाला. त्यात लिखितांच्या पापाचाही. नदीचा आसमंत खळखळून वाहात होता. तिला अभिमान वाटत होता, तिच्यामुळे कोणी निर्मळ झाले नव्हते, तर तीच निर्मख झाली होती. धन्य झाली होती. गावोगाव शेते फुलवणारे, शेतकऱ्यांना समाधान देणारे सगळे पुण्य तिने लिखितांच्या चरणावर वाहिले. तो सोहळा दोन्ही तीरांवर असंख्य लोक उभे राहून पहात होते. तेव्हापासून त्या नदीला हात देणारी ‘बाहु दा’नदी म्हणतात. पहाणारे धन्य, ती नदी धन्य, आणि लिखित ऋषीही धन्य.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView