2. क्षमेची सूडकथश

Date: 
Sun, 24 Jul 2011

द्रौपदीचे ओठ थरथर कापत होते. त्या ओठातून कोणते शब्द बाहेर पडणार हे समोरच्या अपराध्याला कळत नव्हते. स्वत: केलेल्या भयानक अपराधाच्या जाणीवेने तो घाबरा झालेला जीव होता.
द्रौपदीच्या डोळ्यात पाण्याचा पूर होता. आत आलेल्या संतापाची आग या पाण्याने आणखी भडकेल, असे पाहणाऱ्यांना वाटत होते. अश्र्वत्थाम्याने विश्र्वासघात करून, रात्रीच्या रात्री द्रौपदीचे लाडके लेक झोपेतच मारून टाकले होते.
द्रौपदी अश्र्वत्थाम्याला काय शिक्षा सांगणार होती?
मेलेल्या मुलांचे देह आजूबाजूला पसरलेले होते. र क्त आणि मांस यांचे जळके गोळे, ऐकणाऱ्यांच्या चित्तामधील उग्रता वाढवीत होते.
द्रौपदीच्या पुटपुटत्या मध्यमा ओलांडली. तिची वैखरी म्हणाली, “सोडून द्या अश्र्वत्थाम्याला. “
ऐकणारे हादरून गेले. त्यांना द्रौपदीचाही राग आला.
द्रौपदी, हेलावणारा हुंदका आवरीत म्हणाली, “अश्र्वत्थाम्याला मारले तर याच्या आईला किती दु:ख होईल? मुलाच्या मरणाने आईला किती दु:ख होते, ते मी आत्ताच अनुभवले आहे. त्याचं दु:ख आणखी कोणाला नको. “
द्रौपदीच्या दिव्यत्वाने ऐकणारे ओशाळले. त्यांचे हात जोडले गेले आणि त्यांना पुढचे शब्द ऐकू आले, “पांडवांचे गुरू द्रोण यांचा हा मुलगा, आम्हालाही गुरूसमानच असला पाहिजे. “
अश्र्वत्थाम्याच्या पायाशी वाकलेल्या द्रौपदीने, या संस्कृतीची मान ताठ केली.
कुठल्यही तापापेक्षा पश्चात्ताप अथिक भयंकर. या पश्र्चातापाच्या खाईत जगणे, हाच सूड आहे, असे क्षणभर अश्र्वत्थाम्याला वाटले.
मारण्याने सूड घेण्याची परंपर लौकीक आहे. न मारून सूड घेण्याची परंपरा अ-लौकीक आहे.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView