3. बायबलमधल्या अर्जुनाची गोष्ट

Date: 
Sun, 31 Jul 2011

बायबलचे दोन भाग आहेत. पहिला आहे ओल्ड टेस्टामेंट, त्यामध्ये जॉबची कथा आहे.
जॉबची मुले व मुली मोठ्या भावाकडे जेवण करीत होती. तेवढ्यात एक गडी आंला व म्हणाला, “शबाई लोकांनी तुझे शेत लुटून नेले आहे. “
दुसरा गडी म्हणाला, “दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला. इतर गडी व मेंढरे मेली. “
तिसऱ्याने उंटाच्या चोरीची बातमी आणली व हे होत आहे तो पर्यंत जॉबच्या भावाचे घर कोसळून खाली पडले. मुले, मुली, नातू मेले. जॉबने झगा फाडला. तो डोक्याला बांधून, दंडवत घालून जॉब देवाला म्हणाला, “मी मातेच्या उदरातून बिन कपड्याने आलो, बिन कपड्याने जातो. परमेश्र्वराने सर्व नेले. धन्य परमेश्र्वर. “ या नंतरही जॉबवर अनेक आपत्ती कोसळल्या. भयंकर गळवे झाली. असह्य दु:खाने गांजलेल्या त्या सज्जनाला तीन मित्र धीर देण्यासाठी आले.
दु:खाविरुध्द बंड करण्यासाठी त्या मित्रांनीच जॉबला चिथावले. जॉबने दु:खासाठी परमेश्र्वराला दोष द्यायला सुरुवात केली. पण अखेर परमेश्र्वराशी प्रत्यक्ष बोलायची वेळ आली तेव्हा तो गळाठला. त्याने क्षमा मागितली.
“मला दु:ख का देतोस? “हा जॉबचा परमेश्र्वराला प्रश्र्न होता. गीतेमध्ये अजुर्नाचा देवाला त्यापेक्षा उंच असा प्रश्र्न होता. अर्जुनाने विचारले, “देवा, तू माझ्या बाजूला असताना मला यश, जय व सुख नक्कीच मिळेल, पण माझ्या दुष्ट भावांनासुध्दा मारून मिळालेले यश मला भावेल का? “
“मला दु:ख का? “ हा जॉबचा प्रश्र्न आणि ‘दुसऱ्याला दु:ख देऊन, मिळालेले सुखही मला नको. ‘ ही अर्जुनाची धारणा. यापैकी श्रेष्ठ कोणते, हे ज्याने त्याने ठरवावे. सामान्य माणसाला व्यवहारात वागताना जो प्रश्र्न पडतो तो जॉबने मांडला आहे. आणि परमेश्र्वराने त्याला उत्तर दिले आहे.
जॉबची कथा ही सामान्य माणसाची मर्मग्राही कथा आहे. यात शंकाच नाही.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView