अग्रतेज

Rs.55.00
अग्रतेज

अग्रतेज
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- ९६
देणगीमूल्य:- रु. ५५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

मनशक्ती मासिक-पाठात, स्वामी विज्ञानानंद यांनी वेळोवेळी लिहिलेल्या अग्रलेखांचे संकलन,`अग्रतेज' या ग्रंथात केलेले आहे. त्यातील काही विचार पुढे दिलेले आहेत.

1. कृती पेरली, की कीर्ती उगवते. कीर्ती ही दुसऱ्यांच्या तोंडाने बोलत असते.

2. सत्कृत्य करायचे हात तुमचे, त्याची पावती देणारे हात लोकांचे पाहिजेत.

3. सद्आवर्तनाच्या पुनरावृत्तीने, सत्कार्याच्या पायर्‌या चढत राहिले पाहिजे.

4. जे चांगले उरेल, ते घ्या. जे पुराव्याचे टिकणार नाही, ते बाजूला ठेवा. जगात वाया काहीच जात नाही. शेकडो प्रयोग होत असताना असिद्ध ठरलेले प्रयोग, या सिद्धीच्या मंदिराकडे गेलेल्या पायर्‌या असतात.

5. आपण आपले शत्रू असतो, मित्र बनू.ज्या क्षणाचे त्या क्षणाला केव्हाच मिळत नाही. नियमांच्या भूमीवर, जीवनाची सरिता वहात असते. हातात आलेली त्या क्षणाची ओंजळ घेताना हसण्याजोगे काही नसते, रडण्याजोगे काही नसते. असते ते नियम समजून घेण्याजोगे.

6. मन मनाला खाते, तेव्हा आत्मशिक्षा हे औषध शोधणारे वेडे असतात, की त्यांना वेडे ठरविणारे आपणच वेडे असतो?

7. गतीचा परिणाम नाकारण्याचा प्रयत्न, ही ज्ञानाची अधोगती म्हणावी लागेल.

8. प्रकाश हा परस्परविरोधाचा राजा म्हणायला हवा. मनाची उंची उंचवण्यासाठी, आत्म्याची तृप्ती आत्मसात करण्यासाठी, आपल्या विचारांचे प्रतिबिंब, लोकांच्या मनात उमटले पाहिजे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView