अमृतानुभव

Rs.165.00
अमृतानुभव

अमृतानुभव
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- २५६
देणगीमुल्य:- रू. १६५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी अगदी लहान वयात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यासारखे महान ग्रंथ लिहून, मराठी वाङ्मय समृद्ध केले. खूप लहान वयात, कष्ट, अपमान, दारिद्य्र यांचे विष हसत पचवून, त्यांनी अमृतानुभवांचा कलश मात्र जनसामान्यांपर्यंत पोहचवला.

अमृतानुभवात अध्यात्म आणि तत्त्वज्ञान ओतप्रोत आलेले आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणे येथेही विश्वाचे कल्याण व्हावे, हीच त्यांच्या अंतरीची तळमळ आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभवाच्या माध्यमातून अध्यात्मातील सूक्ष्मत्व दाखवून दिले आहे, तर स्वामी विज्ञानानंद यांनी क्वांटम मेकॅनिक्समधील सूक्ष्मत्व आणि अध्यात्मातील सूक्ष्मत्व यांचा उत्कृष्ट मिलाफ करुन, त्यातील गूढता अगदी साध्यासोप्या भाषेत उलगडून दाखवली आहे. शिव-शक्तीची एकता तसेच एकमेकांवर अवलंबून असणे, ही ज्ञानेश्वर महाराजांची सांगी, स्वामीजींनी विज्ञानाच्या पण सोप्या शब्दात कथन केली आहे.

शिव म्हणजे काय? शक्ती म्हणजे काय? आपण वास्तविक त्यांना दृश्य, जड शरीरात समजतो आणि तेथेच घोटाळा करुन बसतो. थोडक्यात शिव म्हणजे चांगले आणि शक्ती म्हणजे गति. तेव्हा आयुष्यात चांगली गती निर्माण करणे, हे ज्ञानेश्वरांना अभिप्रेत आहे. चांगले म्हणजे स्वत:पुरते नव्हे, तर त्या परम शक्तीच्या हेतूला पूरक असे म्हणजेच परकल्याणाच्या दृष्टीने आपली शक्ती, गती वापरली तरच आपण शिवशक्तीमय होऊ. परकल्याणाबरोबर स्वकल्याण आपोआप होईलच.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView