चोर आणि ईश्वर (नाटक)

Rs.45.00
चोर आणि ईश्वर (नाटक)

चोर आणि ईश्वर
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- ८५
देणगीमूल्य:- रु. ४५/- कुरियर चार्जेस अधिकीचे

ज्ञान आणि मनोरंजन करणारे हे एक विशेष नाटक आहे.

नारदांना विश्वात विहार करीत असता पृथ्वीवर फारच चिंताजनक परिस्थिती दिसली. पृथ्वीवरील मानवजात एकमेकात भांडता भांडता विनाशाकडे जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा खरोखर जगात अवतार घेण्याइतका आकांत झाला आहे का हे पहाण्यासाठी, मानवाची प्रगती पहाण्यासाठी नारद व कृष्ण पृथ्वीवर आले. कोणा थोरामोठ्याच्याकडून सत्य समजण्याऐवजी, सामान्य जनतेकडून ते अधिक लौकर समजेल, म्हणून त्यांनी एका चाळीत अवतार घेतला. त्यांनी मानव-वेष धारण केला. माणसांची चाचणी घेण्याऐवजी कृष्णालाच कैदेत पडावे लागले, आणि माणसांनी केलेल्या करामतीतून सुटता सुटता तो अगदी बेजार झाला.

ही नाट्यकृती तुम्हाला हास्य, प्रणय, व्याकुळता, औत्सुक्य, भक्ती यांच्या रसपंक्तीतून हिंडवून आणेलच. त्याप्रमाणे ज्ञान आणि मनोरंजनही देईल. तसेच याशिवाय तुम्हाला काही अपूर्व अनुभव मिळेल, तो शब्दापलीकडे असेल.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView