ताणमुक्त यश

Rs.25.00
ताणमुक्त यश

ताणमुक्त यश

लेखक:- स्वामी विज्ञानानंद

भाषा:- मराठी

पाने:- ४८

देणगीमूल्य:- रु. २५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

सध्याच्या मुलांमुलींवर - मागील पिढीच्या तुलनेत - किमान ९७५% ताण जास्त आहेत; ते कोणते? ते ताण कमी करण्यासाठी पालकांनी घ्यायच्या ३ काळज्या या पुस्तिकेत दिले आहेत.

वाढत्या महत्त्वाकांक्षा, वाढती चढाओढ, स्पर्धा या सर्वांना मुलांना तोंड द्यावे लागत आहे. मुलांच्यावर असलेल्या प्रचंड ताणाचा विचार करता, पालकांनी कोणत्या काळज्या घ्यायला हव्यात, मुलांनी कोणते उपाय करायचे याबद्दल संशोधनात्मक आराखडाच या ग्रंथात दिलेला आहे.

पालक आपली संपत्ती बँकेत ठेवतात. पण आपली खरीखुरी संपत्ती म्हणजे आपली मुलेच आहेत. तेच आपल्या आयुष्यातील आधार आहेत, हे पालक नेमके विसरतात. मुलांची योग्य तऱ्हेने व वेळेवर काळजी घ्यायला हवी, त्यांच्यावर सुसंस्कार व्हायला हवेत, चांगले शिक्षण त्यांना मिळायला हवे. त्यांच्या शरीराची काळजी घ्यायला हवी. आजचे बालक हेच उद्याच्या देशाचे सुजाण, सुविद्य, कर्तबगार नागरिक बनणार आहेत. देशाचे आधारस्तंभ होणार आहेत. त्यासाठी न्यू वे प्रयोगकेंद्रात अनेक प्रयोग चालू आहेत. त्याबद्दलची चर्चा या पुस्तकात केली आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView