शिव खंड १ (शिव रहस्य)

Rs.110.00
शिव खंड १ (शिव रहस्य)

शिव-रहस्य (शिव खंड १)
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- १९४
देणगीमुल्य:- रू.११०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

‘शिव’ या गूढ रहस्यावर आधारित एकूण चार कादंबर्याु प्रसिद्ध झाल्या आहेत; त्यातील ‘शिव रहस्य’ ही पहिली कादंबरी.

कुठलाही भक्त संकटात सापडला, की शंकरांच्या चेहर्या वर त्या वेदना आकारत, आणि मग ते संकट जणू स्वत:वरच कोसळले आहे अशा तर्हेयने शंकर ते संकट निस्तरायला धावत. एखाद्या भक्ताने शंकरांचा संकटकाळी धावा केला, की शंकरांनी त्या भक्ताकडे धाव घेतलीच. शंकरांची ही सगळी मर्मस्थाने, पार्वतीला माहीत झाली होती. म्हणूनच कैलासावरील त्या शांत वातावरणात ध्यानस्थित बसलेले शंकर एकाएकी उठले, तेव्हा पार्वती काय समजायचे ते समजली. शंकर आता पृथ्वीवर अवतार घेणार हे त्यांच्या चेहर्याीवरुनच पार्वतीनं ताडलं आणि मग तिनेही मनोमन एक निश्चय केला. हरिदेवांना वाचवण्यासाठी शंकर धावले व शंकरांसाठी पार्वती धावली आणि मग पृथ्वीतलावर एकामागून एक रहस्यमय घटना घडू लागल्या.

हरिदेव हा शिवभक्त, लहानपणापासून शंकरांची भक्ती एकनिष्ठेने करीत होता. त्याच्या भक्तीला, निष्ठेला एकाएकी तडा का गेला? स्वप्नात का होईना पण तो शंकरांवर का रागवला? त्यासाठी शंकरांनी काय केले? त्यातून काय काय घटना निर्माण झाल्या?... हे सर्व कळण्यासाठी कादंबरी वाचायला सुरुवात करा. एकदाका ही प्रचंड उत्कंठावर्धक कादंबरी वाचायला सुरुवात केलीत, की ती पूर्ण वाचून झाल्याखेरीज आपण ती खाली ठेवणार नाही हे निश्चित!

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView