शिव खंड ४ (शिवशक्ती)

Rs.110.00
शिव खंड ४ (शिवशक्ती)

शिव-शक्ती (शिव खंड ४)
रहस्य-दिव्य कादंबरी
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:-२१६
देणगीमुल्य:- रू. ११०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

अॅमेझॉन हे एक अचाट सामर्थ्य. तिच्या उगमावर पीक कसलं असेल, तर पावसाचं. खालच्या मातीत कुठलीही बी, या पावसाच्या पिकानं गुणाकारासारखी वाढे. ऍमेझॉन मुखाकडे वाही, तसेच तीचे रंग बदलत, वर उन असलं तरी, आकाशाची उन्हाळी चादर, धुळीनं कायमची खराब रहाणार नाही. ढगांचे धोबी पहाता पहाता आकाश स्वच्छ करुन टाकणार... ऍमेझॉन ही निसर्गानं काढलेली अद् भूत जलरेषा नाना रुपांची, नाना रंगांची, ढीगभर ढगांची, सौम्य सोमाची आणि रेखीव रुद्राची. अशा या ऍमेझॉन सारख्या परिसरात, महारत्नाचा पाठलाग यशस्वी झाला... पण माणसाला कुबेर रत्ने हवी असतात, की कैलासाची भव्य-दिव्य शांती ?

धडधडत्या हृदयाने वाचावी व जीवनातले अनेक प्रश्न शांतीने सुटावे, अशी ही जगावेगळी अखेरची ‘शिव-शक्ती’ कादंबरी; ती वाचण्याचे भाग्य तुम्हाला असो. शिव ही एक उत्कंठावर्धक भयरम्य, रहस्यथरारक, प्रगत भव्य कादंबरी. चार खंडांच्या मालिकेतील ही चौथी आणि अखेरची कादंबरी, ‘शिव शक्ती’.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView