संस्कार स्मृती

Rs.65.00
संस्कार स्मृती

संस्कार स्मृति
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- ११२
देणगीमूल्य:- रु. ६५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

संस्कार स्मृति हा स्वामी विज्ञानानंद यांच्या प्रगतीच्या, उन्नतीच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा आहे. एखादा लहान निर्झर दगडाधोंड्यातून दर्याा खोर्यानतून वाहात जातो. त्याला असंख्य अडचणीतून मार्ग काढावा लागतो. कधी दुष्कर, कधी सुकर, मार्गक्रमण करीत असताना आपणासमोर प्रपाताचे भव्य रुप ठेवताना तर कधी सुंदर निसर्गशिल्प साकारताना दिसतो, तेव्हा त्याची भव्यता, दिव्यता, यामुळे आपण प्रभावित होतो. ते नेत्रदिपक यश मिळविण्यामागे किती लोकांचे सहकार्य होते, किती लोकांची पुण्याई होती याचे भान स्वामीजींनी ठेवले. म्हणून तर संस्कार स्मृति रुपाने त्या आठवणी लिहिल्या. त्या वाचताना स्वामीजींचा अहंकार दिसणार नाही. कारण त्यांना स्वत:लाच किंबहुना ‘मी’चाच लय करायचा होता. त्यापूर्वी कृतज्ञतेने शक्य तेवढ्यांच्या आठवणी या ग्रंथात साकार झालेल्या दिसतील. इतिहास जुना असतो, म्हणून त्याकडे पाठ करायची नसते. तर तो पाठ करुन त्यापासून योग्य धडा घ्यायचा असतो. या संस्कार शिल्पातून अनेकांना, जिज्ञासूंना एक आगळा वेगळा आनंद मिळेल, तर कित्येकांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळेल.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView