शरीराशी संवाद - एक अपूर्व ध्यान पद्धत (ऑडिओ सीडी)
शरीराशी संवाद - एक अपूर्व ध्यान पद्धत (ऑडिओ सीडी)
भाषा:- मराठी
देणगीमुल्य:- रू. १२५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे
ह्या ऑडियो सीडीमध्ये, दोन अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय ध्यान-पद्धती सांगितलेल्या आहेत-
१. कुंडलिनी ध्यान (षड्चक्र ध्यान)
२. ॐ ध्यान
प्राचीन भारतीय योगशास्त्रातील एक सर्वोत्कृष्ट ध्यान-पद्धती म्हणजे कुंडलिनी ध्यान अर्थात षड्चक्र ध्यान. हे ध्यान का करावे? कसे करावे? त्याचे फायदे कोणते? ही माहिती यामध्ये आहे.
ॐ चे महत्व, वेद आणि उपनिषद काळापासून ऋषिमुनि, संत आदी सर्वांनी सांगितलेले आहे. ओमपासून विश्वाची उत्त्पत्ती झाली आहे, असे मानले जाते. आधुनिक विज्ञानातील वेव्ह-पार्टिकल थिअरीचा विलक्षण समन्वय ओम प्रतीकात आढळून येतो, असे स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले आहे.
कुंडलिनी ध्यान आणि ओम् संकल्पनेचे ज्ञान समजून घेऊन, सदर सीडीमधील उच्चारणावर सातत्याने ध्यान केले (किंवा स्वत:च त्याचे उच्चारण केले), तर आपल्याला ध्यानाचे चांगले अनुभव येतील.