गर्भसंस्कार संच

Rs.940.00
गर्भसंस्कार संच

गर्भसंस्कार संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. ९४०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

साहित्य:-

१. गर्भाचे भावविश्व

२. मूल आइच्या पोटातून बोलते; ऐकायला शिका

३. जन्मपूर्व नोंदवही - भाग १, २

४. गर्भसंगीत (नविन सीडी)

५. गरोदरपणातील योगासने (व्हीसीडी)

६. जीवनगीता

७. १०० छोट्य़ा गोष्टी

८. रसदार कथा

९. रंजक, बोधक कथा

१०. संस्कार (कथा)

११. चांगुलपणाचे चमत्कार

१२. प्रार्थना

१३. सप्तवार्षिक शिशुकल्याण प्रकल्प

१४. मनआरेखन तक्ते

वैदिक आणि आधुनिक गर्भ-विज्ञानावर आधारित, मराठी भाषेतील गर्भसंस्कार संचाची ही दुसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. २००७ साली, या संचाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली.

‘गर्भसंस्कार’ संकल्पनेचा तात्त्विक पाया आणि गर्भाचे मानसशास्त्र सांगणारे दोन महत्वपूर्ण ग्रंथ यामध्ये आहेत- ‘मूल आईच्या पोटातून बोलते, ऐकायला शिका’ आणि ‘गर्भाचे भावविश्व’. मंत्र, संगीत आणि शुद्धस्वरांच्या माध्यमातून गर्भस्थ बालकाच्या सुरेल स्वागतासाठी आणि संस्कारासाठी, तिमाहीनुसार, ‘गर्भसंगीत’ उपलब्ध केले आहे.

नैसर्गिक आणि सुलभ प्रसूतीसाठी ‘गरोदरपणातील योगासने’ ही व्हिडियो सीडी आहे. मेंदूच्या समतोल विकासासाठी खास ‘मन आरेखन तक्ते’ दिले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण धैर्य चित्रे आणि विविध उपाय सांगणारी, गर्भवती मातेसाठीची रोजनिशी अर्थात् ‘जन्मपूर्व नोंदवही’ ही नित्य नवा धीर देणारी आहे.

याशिवाय ज्ञान, भक्ती, मनोरंजनपर चार गोष्टींची पुस्तके, प्रत्यक्ष आचरणात आणावयासाठीची ‘जीवनगीता’, सप्तवार्षिक शिशुकल्याण प्रकल्प पुस्तिका आणि प्रार्थना पुस्तिका- थोडक्यात, भरगच्च ज्ञान-संस्कारांचा मेवा देणारा, गर्भधारणा ते प्रसूती आणि जन्मोत्तर पहिले तीन महिने येथवर शास्त्रशुद्ध संस्कार कसे करावेत याची परिपूर्ण माहिती देणारा, मनशक्तीचा हा वैशिष्ट्यपूर्ण संच आहे. (मूळ देणगीमूल्य: रू. १०८५/- सवलत देणगीमूल्य: रु. ९४०/-)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView